प्राचार्य संदेश

Principal Image

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पद स्पर्शानी पावन झालेले गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंढा तहसील पवनी जिल्हा भंडारा ग्रामीण भागात घरोघरी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचावी या हेतूने शिक्षणमहर्षी स्वर्ग. तुकारामजी मोटघरे यांनी सन १९५३ मध्ये गांधी विद्यालय शिक्षण संस्थेची पहिली शाळा कोंढा येथे सुरु केली .सुरुवातीला मात्र पाच पंचवीस विद्यार्थ्यांनी सुरु झालेली शाळा हल्ली या शाळेतील पटसंख्या १७००-१८०० पर्यंत पोहोचलेली आहे. या सगळ्यांचे श्रेय जाते ते या शाळेत आज पर्यंत कार्यरत, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक मुख्याधापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाच.

माझ्या या नामांकित शाळेचा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्तयेत्तर विकास व्हावा या उदात्त हेतूने झपाटलेले विधमान संस्थाध्यक्ष ऍड. आनंदजी जिभकाटे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातून प्रगल्भ अशा कल्पकवृत्तीतून या शाळेला नवे रूप व नवी दिशा प्राप्त झाली आहे.

माझा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेताना ज्ञानरूपी मंदिरात रममान व्हावा व स्पर्धेच्या युगात शहरी भागातील विद्यार्थ्यापेक्षा कुठेही कमी पडू नये यासाठी शाळेत सर्व भौतिक सोयी-सुविधा असलेली सुसज्ज बहुमजली इमारत, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा, संगणक कक्ष ई - लर्निंग शिक्षण, बाग बगीचा, प्रशिक्षित व अनुभवी उच्चविधाविभुषित प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद तसेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांनी परिपूर्ण असलेली आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य घडविणारी शाळा म्हणजे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय होय.

आमचे ध्येय

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साध्य करणे.
  • सामाजिक बांधिलकी जपणे.
  • नेपुण्यपुर्ण शिक्षण देवून राष्ट्राच्या विकासाकरिता हातभार लावणे

आमचं दृष्टीकोन

  • विद्यार्थाना उच्च दर्जाचे शिक्षण देणे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा , सुप्त गुणांचा विकास करणे.
  • आदर्श विद्यार्थी व समाजाचा सुगाण नागरिक निर्माण करणे.
  • भविष्याची वाटचाल योग्य दिशेने व्हावी याकरिता प्रयत्नशील करणे.
प्राचार्य
- श्री. डी.एस. चेटुले