वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पद स्पर्शानी पावन झालेले गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंढा तहसील पवनी जिल्हा भंडारा ग्रामीण भागात घरोघरी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचावी या हेतूने शिक्षणमहर्षी स्वर्ग. तुकारामजी मोटघरे यांनी सन १९५३ मध्ये गांधी विद्यालय शिक्षण संस्थेची पहिली शाळा कोंढा येथे सुरु केली .सुरुवातीला मात्र पाच पंचवीस विद्यार्थ्यांनी सुरु झालेली शाळा हल्ली या शाळेतील पटसंख्या १७००-१८०० पर्यंत पोहोचलेली आहे. या सगळ्यांचे श्रेय जाते ते या शाळेत आज पर्यंत कार्यरत, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक मुख्याधापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाच.
माझ्या या नामांकित शाळेचा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्तयेत्तर विकास व्हावा या उदात्त हेतूने झपाटलेले विधमान संस्थाध्यक्ष ऍड. आनंदजी जिभकाटे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातून प्रगल्भ अशा कल्पकवृत्तीतून या शाळेला नवे रूप व नवी दिशा प्राप्त झाली आहे.
अधिक वाचावेगळी विशाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणक प्रयोगशाळा
वाचन कक्षामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके उपलब्ध आहेत.
नैसर्गिक प्रकाश आणि ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेंटिलेशनसह शाळेत विशाल वर्ग कक्ष आहे